⭕ स्वतःवर विश्वास ठेवा
एक राहुल नावाचा मुलगा खूप प्रयत्न करुन सुद्धा पुढच्या वर्गात जात नव्हता. गेला तरी एका वर्गात दोन वर्षं तरी त्याला लागत. त्याचा आत्मविश्वास कमकुवत होत चालला होता.
त्याने खूप प्रयत्न करुन पास होत शिक्षक बनला. शाळेवर त्याने मुलांवर अध्यापन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला नीट शिकविता येत नाही म्हणून शाळेनेच काढून टाकले. तो खूप नाराज झाला.
त्याचे नीताशी लग्न झाले. नीता एक आत्मविश्वासू मुलगी होती. राहुलच्या या दुःखाची तिला कल्पना होती. तिने त्याला पुढे जाण्यासाठी प्रत्येकवेळी प्रेरणा दिली होती. ती म्हणाली, " ज्यावेळी आपल्याला पुढे जाण्यासाठी अडथळे येतात, त्यावेळी परमेश्वर आपल्याला काही अवधी देत असतो. त्यावेळेत आपण नक्की यशस्वी होण्याचा प्रयत्न करायला हवा. आत्मविश्वास ठेवायला हवा. न्यूनगंड सोडून द्यायला हवा. परमेश्वर आपल्याला नक्कीच चांगलं मिळवून देण्याची तयारी करीत असतो. आपल्याला संयम ठेवता यायला हवा. "
राहुल तरीही स्वतः साशंक असतो. त्यामुळे तो असफल होत असतो. एकदा त्याला कल्पना सुचते. तो मूकबधिरांच्या शाळेत जातो. तो तिथे त्या मुलांना शिकविण्याचे तंत्र अवगत करतो. मुले त्याच्यावर खुश होतात. त्याने शिकविलेले मुलांना समजू लागते. त्या दिव्यांग शाळेचे प्राचार्य राहुलला अध्यापक म्हणून नेमणूक देतात. राहुलचा आत्मविश्वास आता चांगलाच वाढत जातो. मुलांना चांगलं तयार करताना तो नेहमीच भान हरपून काम करत राहतो.
आता तो आपली स्वतःची शाळा उघडतो. त्यात मूकबधिरांना प्रवेश देतो. राहुलने अशा अनेक शाळा सुरु केलेल्या असतात. प्रत्येक शाळेत त्याला यश मिळत जातं. आता तो मूकबधिरांसाठी संसाधने बनविण्यासाठी विचार करु लागतो.
मूकबधिरांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या उपकरणांना निर्माण करण्याचे तंत्र शिकून घेऊन तो त्यातही यशस्वी होतो. त्याची पत्नी त्याला प्रत्येक यश आणि अपयशात पाठीशी उभी असते.
राहुलला आता समजलेलं असतं कि कोणतीही जमीन नापिक नसते, त्यात कोणतं बीज लावायचं हे आपल्याला समजायला लागतं. ते एकदा समजलं कि यश मिळत जातं. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं.
🔹 प्रवीण अशितोष कुबल
मुख्याध्यापक, शिडवणे नं. 1
No comments:
Post a Comment